logo

माजी मंत्री पिचड रुग्णालयात; प्रकृतीत सुधारणा अकोले (प्रतिनिधी) माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडल्याने त

माजी मंत्री पिचड रुग्णालयात; प्रकृतीत सुधारणा

अकोले (प्रतिनिधी) माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोमवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

माजी मंत्री मधुकरराव पिचड सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते. माजी आमदार वैभव पिचड यांनी स्वतःला तर सावरले व उपस्थित कार्यकत्यांना धीर दिला. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी 'सांगितले.

त्रास देणाऱ्या लोकांची सहानुभूती नको

सीताराम गायकर, डॉ. किरण लहामटे, अशोक भांगरे हे आम्ही पिचड साहेबांच्या संपर्कात असून त्यांची प्रकृती सुधारत आहे असे प्रसार माध्यमांना सांगून तालुक्यातील जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये. त्यांना प्रामाणिकपणे चौकशी कराव्याची होतीच तर मला फोन करावयाचा होता. जाणीवपूर्वक त्रास देऊन वैयक्तिक बदनामी करून त्रास देणाऱ्या लोकांची सहानुभूती आम्हाला नको आहे, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप प्रदेशध्यक्ष तसेच ना. राधाकृष्ण विखे, आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिचड यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना धीर दिला

0
17525 views